शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिस इंडिया दिल्ली मानसी सेहगल हिचा आपमध्ये प्रवेश, तरुणाईला राजकारणात येण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 1:07 PM

1 / 10
नवी दिल्ली : राजेंद्र नगरचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत मिस इंडिया दिल्ली -२०१९ मानसी सहगल (Mansi Sehgal) हिने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
2 / 10
मानसी सहगल ही एक प्रशिक्षित अभियंता, टेडएक्स स्पीकर आणि उद्योजक आहे, तिचे स्वतःचे स्टार्टअप आहे. मिस इंडिया दिल्ली स्पर्धेदरम्यान मानसी सहगल हिने आपला परिचय करुन देताना स्वत: ला समाजसेवा करण्याची आवड असल्याचे सांगत अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
3 / 10
राघव चड्ढा म्हणाले की, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे युवकांमध्ये राजकारणात येण्याची आणि लोकांची सेवा करण्याचा विश्वास वाढवत आहे, याचा मला आनंद आहे. आम आदमी पार्टीचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे. मी मानसी यांचे आपल्या कुटुंबात स्वागत करतो.
4 / 10
याचबरोबर, आम आदमी पार्टीमध्ये सामील झाल्यानंतर मानसी सहगल हिने प्रतिक्रिया दिली आहे. मला अगदी लहान वयातूनच समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे, असे मानसी सहगल हिने सांगितले.
5 / 10
तसेच, कोणत्याही देशाच्या समृद्धीसाठी आरोग्य आणि शिक्षण हे दोन मुख्य मार्ग आहेत आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात प्रचंड बदल घडवून आलेला दिसून येत आहे, असे मानसी सहगल म्हणाली.
6 / 10
आम आदमी पार्टीत येण्यास कशामुळे प्रेरणा मिळाली, असा सवाल केल्यानंतर मानसी सहगल हिला करण्यात आला. त्यावेळी तिने सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमुळे व आमदार राघव चड्ढा यांच्या कठोर मेहनतीमुळे प्रेरित होऊन मी आम आदमी पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 10
स्वच्छ राजकारणाद्वारे आपण जगात मोठा बदल घडवून आणू शकतो, असे मानसी सहगल हिने सांगितले. याशिवाय, युवक आणि महिलांनी राजकारणाचा सक्रिय भाग घेण्याबाबत मानसी सहगल हिने भाष्य केले.
8 / 10
युवकांनी, विशेषत: आमच्या महिलांनी आमच्यासोबत राजकारणात सहभागी व्हावे आणि राजकारणात बदल घडवावा, असे सांगत मानसी सहगल हिने महिलांना आणि युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.
9 / 10
दरम्यान, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण संपल्यानंतर मानसी सहगल हिने नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.
10 / 10
दुसरीकडे, दिल्लीशिवाय आता आम आदमी पार्टीची इतर राज्यांत चांगली कामगिरी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने अनपेक्षित यश मिळवले आहे. पार्टीने जवळपास १० जागांवर आघाडी घेतली होती.
टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीPoliticsराजकारण