शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Praggnanandhaa beats Magnus Carlsen, Chess : 'वर्ल्ड चॅम्पियन' बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन गुडघे टेकायला भाग पाडलेला भारताचा १६ वर्षीय प्रग्यानंद कोण आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 5:19 PM

1 / 7
भारताचा १६ वर्षांचा बुद्धिबळपटू आणि युवा ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद याने मोठी कामगिरी करून दाखवली. भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या 'वर्ल्ड चॅम्पियन' बुद्धिबळ मास्टर मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. प्रग्नानंदने केवळ ३९ चालींमध्ये कार्लसनला गुडघे टेकायला भाग पाडले.
2 / 7
एअरथिंग्ज मास्टर्स (Airthings Masters chess) या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने ही कामगिरी करून दाखवत भारतीय क्रीडाप्रेमींना सुखद धक्का दिला. कार्लसनने यापूर्वी सलग तीन सामने जिंकले होते, पण प्रग्यानंदने त्याच्या अश्वमेध रोखला. 'वर्ल्ड चॅम्पियन'ला आपल्या पुढ्यात गुडघे टेकायला लावणारा हा आर प्रग्यानंद नक्की कोण आहे? हे आपण आता जाणून घेऊया.
3 / 7
आर प्रग्यानंदचं पूर्ण नाव रमेशबाबू प्रग्यानंद असं आहे. प्रग्यानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ साली चेन्नईमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रग्यानंदने बुद्धिबळ खेळू नये असं त्याच्या वडिलांचं मत होतं. पण त्याची बुद्धिबळातील प्रगती पाहता कुटुंबाने त्याला बालपणापासूनच पाठिंबा दिला.
4 / 7
प्रग्यानंदची मोठी बहिण वैशाली ही देखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. दोन मुलांना बुद्धिबळ शिकवणं शक्य नसल्याने वडिलांचा प्रग्यानंदच्या बुद्धिबळाला विरोध होता. पण बालपणापासून मोठ्या बहिणीला बुद्धिबळ खेळताना पाहून प्रग्यानंदलाही बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.
5 / 7
प्रग्यानंदने World Youth Chess Championships Under-8 चे विजेतेपद २०१३ साली पटकावले. त्यामुळे त्याला अवघ्या सातव्या वर्षी फिडे (FIDE) मानांकन मिळाले. २०१५ साली त्याने दहा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले.
6 / 7
प्रग्यानंदने २०१६ साली नवा इतिहास रचला. सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचा मान प्रग्यानंदने २०१६ मध्ये मिळवला. त्यावेळी त्याचे वय अवघे १० वर्षे १० महिने आणि १९ दिवस इतकेच होतो.
7 / 7
प्रग्यानंद ९०व्या मानांकनासह बुद्धिबळ विश्वचषक २०२१ मध्ये सहभागी झाला होता. चौथ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला Maxime Vachier-Lagrave याने पराभूत केले. प्रग्यानंदने २०२२ साली Masters विभागातही सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला सव्वा पाच गुणसंख्येसह १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
टॅग्स :Chessबुद्धीबळIndiaभारत