फुटबॉल विश्वातील सर्वात हॉट खेळाडू! कोण आहे 'ही' क्वीन?; ग्लॅमर, स्टाईल अन् बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:00 IST2026-01-24T14:56:27+5:302026-01-24T15:00:51+5:30

फुटबॉल विश्वातील सर्वात हॉट खेळाडू अलीशा लेहमन आता पुन्हा इंग्लंडच्या जर्सीत दिसणार आहे. या २७ वर्षीय स्विस स्टारला बहुतेकदा जगातील सर्वात सेक्सी फुटबॉलपटू म्हटले जाते. लेहमनने लेस्टर सिटी विमेनसोबत २ वर्ष ६ महिन्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे.

अलीकडेच इटालियन संघ कोमोकडून खेळलेल्या लेहमनने इंग्लंडमध्ये परतल्यानंतर होमकमिंग असा उल्लेख केला. ती म्हणाली, "हा एक अद्भुत अनुभव आहे. लेस्टर हा एक उत्तम क्लब आहे आणि महिला फुटबॉलला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे असं तिने सांगितले.

इतकेच नाही तर मागील काही तासांपासून अलीशा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरूनही चर्चेत आली आहे. तिने लव्ह आयलँड स्टार मॉटेंल मॅकेजीसोबत डेट करणे सुरू केले आहे. सोशल मीडियावर मॉटेंलने अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खासगी फोटो शेअर केला आहे.

दोघांनी केएसआयच्या 'Baller League'मध्ये एकत्र काम केले आहे. जिथे अलीशा टीमचं व्यवस्थापन करत होती आणि मॉटेंल खेळत होता. त्यांचे इथेच संबंध जुळले आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अलीशा मॉटेंलला तिच्या कोमो अपार्टमेंटमध्ये वीकेंड गेटवेसाठी आमंत्रित केले आहे.

अलीशा पूर्वी ब्राझिलियन फुटबॉलपटू डग्लस लुईझसोबत रिलेशनशिपमध्ये होती पण २०२२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. आता अलीशासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. इंग्लंडमध्ये फुटबॉलचा धमाका आणि जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते.

अलीशाचे इंस्टाग्रामवर १५.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. ही फक्त एक संख्या नाही - तर तिच्या प्रत्येक फोटोवर, प्रत्येक क्षणावर आणि प्रत्येक हालचालींवर लाखो फॅन्सना घायाळ करते.

अलीशा लेहमनचा जन्म २१ जानेवारी १९९९ रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाला. वयाच्या ९ व्या वर्षापासून तिने फुटबॉलमध्ये करिअर सुरू केले. BSC Young Boys Frauen या क्लबमध्ये तिने खेळण्यास सुरू केले.

२०१८ मध्ये अलीशाने इंग्लंडच्या WSL (Women’s Super League) मध्ये West Ham United कडून आपल्या व्यावसायिक करिअरची पायरी चढली. त्यानंतर ती Everton, Aston Villa आणि नंतर इटलीमध्ये Juventus, Como यांसारख्या युरोपियन क्लबांसाठी देखील खेळली आहे.

अलीशा ही स्वित्झर्लंड राष्ट्रीय संघाची सदस्यही आहेत आणि तिने विश्वचषक (FIFA Women’s World Cup) मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. फुटबॉलव्यतिरिक्त ती एक जागतिक सोशल मीडिया स्टार देखील आहे.

सध्या अलीशाने २०२६ मध्ये Leicester City क्लबसोबत करार केला आणि इंग्लिश WSL मध्ये परतलेली आहे. हे तिच्या करिअरमधील एक मोठे अपग्रेड मानले जात आहे. अलीशाने BSC YB Frauen (स्वित्झर्लंड) मध्ये ५२ सामने खेळत २५ गोल मारले आहेत.