श्रेयसीचे सोनेरी यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:47 IST2018-04-11T17:47:04+5:302018-04-11T17:47:04+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची नेमबाज श्रेयसी सिंह हिने महिलांच्या नेमवाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

श्रेयसी सिंहने अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सचा पराभव केला. इमा कॉक्स सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र शूट ऑफमध्ये दोन्हीवेळा अचूक निशाणा साधत श्रेयसीने सुवर्णपदकावर नाव कोरले.

सुवर्णपदकावर निशाणा साधल्यानंतर रायफल उंचावून अभिवादन करताना श्रेयसी सिंह.

२०१४ मध्ये झालेल्या ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही श्रेयसी सिंह सहभागी झाली होती. मात्र त्यावेळी तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती.

श्रेयसी सिंह जिंकलेल्या सुवर्णपदकासह