Shocking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत दाखवणार होती दम; पण 16 व्या वर्षीच विश्वविजेत्या खेळाडूला मृत्यूनं कवटाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:34 PM2020-06-16T15:34:27+5:302020-06-16T15:38:18+5:30

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असलेल्या 16 वर्षी कनिष्ठ विश्वविजेत्या गिर्यारोहक ( climber ) ल्युसी डौआडीचे निधन झाली.

काही दिवसांपूर्वी सराव करताना 150 मीटरवरून खाली पडली.

16 वर्षीय खेळाडू आपल्या मित्रांसह साऊथ इस्टर्न सिटीत हँडरलच्या आधारानं गिर्यारोहण करत होती आणि त्याचवेळी तिचा तोल केला अन् तिला गंभीर दुखापत झाली.

फ्रेंच माऊंटन गिर्यारोहक फेडरेशननं या वृत्ताला दुजोरा दिला.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीती सज्ज होती आणि तिला प्रमुख दावेदार मानले जात होते.

कोरोना व्हायरसमुळे टोक्यो स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असताना क्रीडा विश्वाला धक्का देणारी घटना घडली. कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील विजेत्या ल्युसीनं जगाचा निरोप घेतला.

2019च्या युरोपियन क्लायम्बिंग अजिंक्यपदस्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.

त्याच वर्षी तिनं कनिष्ठ जागतिक स्पर्धा जिंकली. नंतर European Women's Youth Difficulty Championship स्पर्धेत ती तिसरी आली होती,