राफेलची भरारी; फेडररच्या विक्रमापासून आता फक्त एक पाऊल दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:59 IST2019-09-09T15:56:42+5:302019-09-09T15:59:09+5:30

नदालने मेदवेदेव याला अंतिम फेरीत 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 अशा तीन विरुद्ध दोन सेटमध्ये पराभूत करत 19 वे ग्रँडस्लॅम नावावर केले.

जागतिक क्रमवारीतील दोन नंबरच्या टेनिसपटूला पाचव्या क्रमांकावरील मेदवेदेवकडून कडवी झुंज मिळाली.

या निकालामुळे पुरुषांच्या गटातही काहीसा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, नदालने ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले.

नदाल रॉजर फेडररच्या 20 ग्रँडलस्लॅमच्या विक्रमापासून केवळ 1 पाऊल दूर आहे.

पहिल्या दोन सेट मध्ये नदालने 7-5, 6-3 अशी बाजी मारली होती. यामुळे नदाल एकतर्फी जिंकत असल्याचे स्पष्ट होत होते.

तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये मेदवेदेव याने कमबॅक करत अंतिम फेरीमध्ये चुरस निर्माण केली. यामुळे अवघ्या टेनिसप्रेमींचे शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखले गेले होते. अखेर अंतिम सेटमध्ये 6-4 असा सेट जिंकत नदालने ग्रँडस्लॅम पटकावले.

















