बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 12:59 IST2021-06-28T12:51:55+5:302021-06-28T12:59:51+5:30

चाहत्यांचा अतिउत्साह स्पर्धकांसाठी किती महागात पडू शकतो, याची प्रचिती टूअर दी फ्रान्स स्पर्धेत आली. खडतर परिस्थितीवर मात करून शारीरिक कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत एक विचित्र अपघात झाला.
या अपघाताला कारणीभूत एक महिला फॅन ठरली आणि तिच्या एका चुकीमुळे शेकडो सायकलिस्ट एकमेकांवर आदळले अन् अनेकांना दुखापत झाली.
तिचा काही सेकंदाचा उत्साह स्पर्धेला गालबोट लावणारा ठरला. शर्यत सुरू असताना महिला फॅन अचानक एक फलक घेऊन रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिली.
त्यानंतर मागून आलेल्या सायकलपटूची तिला धडक लागली अन् एकामागून एक असे शेकडो सायकपटू एकमेकांवर आदळले.
पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.