शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PKL 2019 : देसाई बंधूंची कमाल; सूरजनं पहिल्याच सामन्यात मोडला सिद्धार्थचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:07 PM

1 / 5
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात बुधवारी दोन सख्खे भाऊ एकत्र खेळताना पाहायला मिळाले. सिद्धार्थ आणि सूरज देसाई या मराठमोळ्या खेळाडूंनी तेलुगू टायटन्सच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, दबंग दिल्ली संघाने अटीतटीच्या लढतीत या सामन्यात 34-33 असा विजय मिळवला.
2 / 5
प्रो कबड्डी लीगमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या सूरजनं विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे या विक्रम नोंदवताना त्यानं भावाचाच म्हणजे सिद्धार्थचा विक्रम मोडला.
3 / 5
सिद्धार्थ आणि सूरज या दोघांनी तेलुगू टायटन्ससाठी 26 गुणांची कमाई केली. त्यात सूरजनं 18, तर सिद्धार्थनं 8 गुण पटकावले.
4 / 5
पदार्पणातच सर्वाधिक गुणांची कमाई करण्याचा सिद्धार्थचा विक्रम सूरजनं बुधवारी मोडला. सिद्धार्थने गतवर्षी यू मुंबाकडून पदार्पणाच्या लढतीत 15 गुण मिळवले होते.
5 / 5
सूरजच्या 18 गुणांमध्ये 13 चढाईचे गुण आहेत, तर 5 बोनस गुण आहेत.
टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीU Mumbaयू मुंबाTelugu Titansतेलगू टायटन्स