नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:56 PM2021-09-16T13:56:06+5:302021-09-16T13:59:05+5:30

नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना जगाचे लक्ष वेधले. त्यानंतर सोशल मीडियावरील त्याच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्यानं वाढले. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर नीरजला मोठ मोठे ब्रँड्सही करारबद्ध करण्यासाठी पुढे आणि त्यामुळे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूतही प्रचंड वाढ झाली.

२३ वर्षीय नीरजवर सुवर्णपदकानंतर बक्षीसांचाही वर्षाव झाला. YouGov SPORTया कंपनीनं केलेल्या सर्व्हेनुसार नीरजच्या सोशल मीडिया मुल्यांमापनातही वाढ झाली आहे. २.९ मिलियन लोकांनी नीरजला इंस्टाग्रामवर 'most mentioned’ खेळाडू म्हणून जाहीर केले. त्यामुळे त्याचे सोशल मीडिया मुल्यमापन हे ४२८ कोटींच्या वर गेले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर नीरजच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्याही वाढली. सोशल मीडियावर त्याला १२.७९ मिलियन इंटरॅक्शन मिळाले आणि ही संख्या ८६.३ टक्क्यांनी वाढली. त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्याही २३०० टक्क्यांनी वाढून ४.५ मिलियन झाली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरजने brand endorsementsची फी २०-३० लाखांवरून थेट २ कोटी इतकी केली. नीरजनं भारताचे क्रिकेटपटू लोकेश राहुल व रिषभ पंत यांनाही मागे टाकले आहे. ते जाहिरातीसाठी वार्षिक 50 लाख ते 1 कोटी फी घेतात. आता नीरज यांच्यापुढे गेला आहे.

'इकोनॉमिक्स टाईम्स'च्या वृत्तानुसार नीरजचं काम पाहण्याऱ्या कंपनीची सध्या लग्झरी ऑटो आणि कपड्याच्या ब्रँडशी चर्चा सुरू आहे. एकूण 5 ते 6 डीलबाबत त्याची चर्चा सुरू आहे. पॅरीसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यंतचे हे करार आहेत, अशी माहिती नीरजचं व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा घोष यांनी दिली आहे.

Read in English