Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:41 PM2021-07-29T15:41:19+5:302021-07-29T16:30:21+5:30

Mirabai Chanu : मीराबाईचा आवडता अभिनेता कोण? याही प्रश्नावर तिने बॉलिूवडचा भाईजान, दंबग सलमान खानचं नाव घेतलं. सलमान खान मला खूप आवडतात, त्यांची बॉडीस्टाईल अधिकच प्रभावी आहे, असे मीराबाईने म्हटलं होतं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली.

पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतरस अनेक ठिकाणी माराबाईच्या आवडीनिवडीबद्दल विचारणा झाली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पदक जिंकल्यानंतर पहिली गोष्ट काय करणार? असा प्रश्न मीराबाईला विचारण्यात आला होता. त्यावर, मला सर्वप्रथम पिझ्झा खायचाय, असं मीराबाईने म्हटलं होतं.

मीराबाईचा आवडता अभिनेता कोण? याही प्रश्नावर तिने बॉलिूवडचा भाईजान, दंबग सलमान खानचं नाव घेतलं. सलमान खान मला खूप आवडतात, त्यांची बॉडीस्टाईल अधिकच प्रभावी आहे, असे मीराबाईने म्हटलं होतं.

मीराबाईने सलमान खान आपला आवडता हिरो आहे असं सांगितलं. तर, दुसरीकडे सलमान खानने मीराबाईचे अभिनंदन करत मीराबाईलाच दबंग म्हटलं आहे.

सलमानने 24 जुलै रोजी मीराबाईच्या रौप्यपदक विजयाबद्दल तिचं अभिनंदन केलं. त्यावेळी, आम्हाला आपला अभिमान आहे... आप तो असली दबंग निकली. देशाच्या सुपरस्टार बनला आहात, असे ट्विट सलमानने मीराबाईबद्दल केले आहे.

मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं होतं.

मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. मीराबाईवर सध्या बक्षीसांचा वर्षावही होत आहे. त्यातच, मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी तिला 1 कोटी रुपये आणि विशेष सरकारी पोस्ट देण्याचीही घोषणा केली आहे.

मीराबाईला आई सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांनी पाच वर्षाआधी स्वत:चे दागिने विकून ऑलिम्पिकच्या रिंग्स असलेल्या कानातील बाळ्या दिल्या होत्या. स्पर्धेदरम्यान मीराबाईच्या कानात त्या दिसत होत्या.

जवळपास २ वर्ष कुटुंबीयांपासून दूर राहणारी मीरा आज सर्व नातेवाईकांना भेटली, आणि कुटुंबीयांसमवेत तिने आनंद साजरा केला