शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झा बनणं सोपं नाही! तिरंग्याचा वाद, शॉर्ट स्कर्टवरून टीका... धैर्याने केला संकटांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 9:25 PM

1 / 12
Sania Mirza Retirement: टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळत आहे. सानियाला बुधवारी खेळलेल्या सामन्यात महिला दुहेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. पण मिश्र दुहेरीत तिने विजयी सलामी दिली.
2 / 12
पण बुधवारच्या तिच्या घोषणेनंतर चाहते खूपच नाराज झाले. सानिया मिर्झाने हा हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. भारतातील महिलांमध्ये टेनिसची क्रेझ निर्माण करण्यात सानिया मिर्झाचा मोलाचा वाटा आहे.
3 / 12
३५ वर्षीय सानियाने निवृत्तीची घोषणा केली. पण सानिया मिर्झा बनणं सोपं नाही. तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता तिच्या संदर्भात अनेक असे प्रसंग आले, जेव्हा सानिया मिर्झा वादात सापडली.
4 / 12
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप असो की शॉर्ट स्कर्टचा वाद असो, सानियाच्या वर्तणुकीमुळे काही अंशी गदारोळ झालाच.
5 / 12
२००५ मध्ये सानिया मिर्झाच्या विरोधात एका धर्मगुरूने फतवा काढला होता. हा फतवा सानिया मिर्झाच्या कपड्यांबद्दल होता. टेनिस कोर्टवर खेळादरम्यान ती शॉर्ट स्कर्ट घालून खेळायची, त्यावरून आक्षेप घेण्यात आला होता. पण खेळताना कोणते कपडे घालायचे हे ती ठरवू शकते असं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं.
6 / 12
२००७ साली सानिया मिर्झाने एका धार्मिक स्थळावर व्हिडिओ शूट केल्यामुळे वाद झाला होता. त्यावरही अनेक धर्मगुरूंनी आक्षेप घेतला होता.
7 / 12
२००९ साली सानियाचा साखरपुडा मोडल्याची घटना घडली. सानियाने तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केला होता, पण ६ महिन्यांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
8 / 12
त्यानंतर त्याच वर्षी सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केलं. त्यावरूनही बराच वाद झाला होता. पण सानियाने या वादाकडे फारसं लक्ष दिलं नाही.
9 / 12
इतक्या वादग्रस्त गोष्टी घडूनही सानिया मिर्झा भारताची लोकप्रिय टेनिसपटू ठरलीय ३५ वर्षीय सानिया मिर्झाने भारतीय महिला टेनिसला जागतिक ओळख मिळवून दिली.
10 / 12
२००८ मध्येही एका कार्यक्रमादरम्यान सानिया मिर्झाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात सानियाने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.
11 / 12
सानियाने गेल्या काही वर्षांत स्पर्धांमध्ये नियमित सहभाग घेतला नाही. मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर तिने खेळाला कमी प्राधान्य दिले.
12 / 12
सानिया मिर्झा ही ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही पदके जिंकली. पण आता मात्र २०२२चा हंगाम संपवून तिने टेनिस कोर्टचा निरोप घेण्याचं ठरवलं आहे.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिसShoaib Malikशोएब मलिकIndiaभारत