शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

36 वर्षांचा दुष्काळ संपवणारा फौआद मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 3:30 PM

1 / 5
भारताच्या फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात आशियाई स्पर्धेत तब्बल 36 वर्षांनंतर भारताला पदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना रौप्यपदक जिंकले. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच वैयक्तिक गटातील पदक ठरले.
2 / 5
फौआदने वयाच्या 5व्या वर्षी घोडेस्वारीला सुरुवात केली. 2002 साली 8व्या वर्षी त्याने स्थानिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.
3 / 5
बंगळुरू आंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनमधील पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याने European Institute was Psychology and Human Resources हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
4 / 5
फौआदच्या नावावर अनेक राष्ट्रीय जेतेपद आहेत आणि त्याला 2014च्या राष्ट्रकुल चषक स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याची ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
5 / 5
आशियाई स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. 1982मध्ये गुलाम मोहम्मद खान यांनी वैयक्तिक पदक जिंकले होते आणि त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा