शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधींचं नाव का?; बबिता फोगाटची काँग्रेसवर 'भालाफेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 4:03 PM

1 / 9
राष्ट्रीय क्रीडा दिनी शनिवारी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला. याशिवाय 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि 13 जणांना द्राणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कोरोना व्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केलं.
2 / 9
क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.
3 / 9
खेलरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (२०००) व सरदारसिंग (२०१७) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ ला कालावधीत राणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना २०१७ ला महिला आशिया चषक जिंकून दिला. २०१८ च्या आशिया चषकात संघाने रौप्य पदक जिंकले तसेच २०१९च्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती.
4 / 9
विनेशने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व २०१९ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते.
5 / 9
टेबल टेनिसपटू मनिका बत्राने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २7 खेळाडूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार मिळाला. राहुल आवारे (कुस्ती) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही अर्जुन पुरस्कार मिळाला.
6 / 9
रोहित शर्मा हा खेलरत्न पुरस्कार जिंकणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचे नाव खेलरत्नसाठी दिले होते.
7 / 9
रोहित शर्मा हा खेलरत्न पुरस्कार जिंकणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचे नाव खेलरत्नसाठी दिले होते.
8 / 9
पण, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर भाजपा नेता आणि राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगाट हिनं टीका केली.
9 / 9
तिनं लिहिलं की,''राजीव गांधी यांनी भारतात उभं राहून इटलीत भाला फेल केली म्हणून त्यांच्या नावानं खेल रत्न पुरस्कार दिला जातो का?''
टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटRajiv Gandhiराजीव गांधीNational Sports Dayराष्ट्रीय क्रीडा दिवस