Rabia Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया, बॉलिवूडच्या ललनांही लाजवेल; पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:54 IST
1 / 7पंजाबमध्ये राजकीय धुळवड सुरु आहे. काँग्रेसमध्ये मोठी उलथा पालथ सुरु असून नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) दिल्लीत तर मुख्यमंत्री चन्नी हे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या भेटीला गेले आहेत. अशातच नवज्योत सिंगची मुलगी (Daughter) राबिया सिद्धूचे (Rabia Sidhu) वक्तव्य आले आहे. 2 / 7राबियाला तिच्या वडिलांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती भावूक झाली आणि म्हणाली की ते मोठी लढाई लढत आहेत आणि ते लढतच राहतील. लोकांना अनेकदा समजत नाही. तुम्हाला असा नेता हवाय जो पंजाबसाठी भावनाशून्य असेल. नवज्योत सिंग सिद्धूंना वेदना होतात म्हणून ते भावूक होतात. राबिया एका पार्कच्या उद्घाटनासाठी आली होती. 3 / 7नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिंग हिचे सौंदर्य बॉलिवूडच्या ललनांही लाजवेल असे आहे. ती 21 वर्षांची आहे. चला जाणून घेऊया राबिया नवज्योत सिंग सिद्धूबद्दल. (Rabia Navjot Singh Sidhu)4 / 7राबियाने पंजाबच्या पटियालामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स सिंगापूर आणि लंडन येथून पूर्ण केला आहे. (Rabia Sidhu is Fashion Designer.)5 / 7राबिया ही सोशल मीडियावर प्रसिद्ध हस्ती आहे. तिचे फोटो इन्स्टा आणि अन्य ठिकाणी लोकांचे लक्ष खेचून घेतात. राबिया उद्या बॉलिवूडमध्ये आली तर नवल वाटायला नको असे तिचे सौंदर्य आहे. ती एक फॅशन डिझायनर आहे. 6 / 7राबिया सिद्धू ही इंटरनेट सेंन्सेशन आहे. इन्स्टावर तिचे 62.3 हजार फॉलोअर्स आहेत. @rabiasidhu हे तिचे अकाऊंट असून ती नेहमी या अकाऊंटवर नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 7 / 7राबियाचे तिच्या शाळेतील मित्रासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. इशान सुरी असे त्याचे नाव आहे. दोघांनीही सिंगापूरला एकत्रच शिक्षण घेतले आहे.