खरा खवय्या! शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात नेलेल्या पदार्थांची नावं वाचून तोंडाला पाणी सुटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:34 IST
1 / 7स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमधून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अंतराळात पोहोचले आहेत. ३९ वर्षीय शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरणार आहेत.2 / 7भारतीय हवाई दलातील दशकभराच्या कारकिर्दीत त्यांनी विविध लढाऊ विमानांचे २,००० तासांहून अधिक काळ उड्डाण केले आहे. लखनऊमध्ये जन्मलेले आणि 'शक्स' या कॉलसाइनने ओळखले जाणारे शुक्ला हे इस्रो व नासाच्या सहकार्याने अॅक्सिअम स्पेसच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह चार अंतराळवीर असलेले ड्रॅगन यान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून बुधवारी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले.3 / 7या अंतराळवीरांनी आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेले पदार्थही या सफरीत आपल्यासोबत घेतले आहेत. शुभांशू शुक्ला यांनीही प्रत्येक भारतीयला प्रिय असणारे खाद्यपदार्थ आपल्यासोबत नेले आहेत.4 / 7अंतराळवीरांसाठी जेवण तयार करणाऱ्या टीमने सांगितले की शुभांशू अंतराळात खास भारतीय पदार्थ खाणार आहे. लष्करी पोषण तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या डीआरडीओच्या शाखेने शुभांशूसाठी तीन भारतीय पदार्थ तयार केले आहेत. या जेवणाच्या यादीत आंब्याचा रस, मूग डाळ हलवा, गाजर हलवा, आमटी-भात यांचा समावेश आहे.5 / 7शुभांशू यांनी त्यांच्यासोबत तयार आंब्याचा रस, मूग डाळ हलवा आणि गाजर हलवा घेतला आहे. हे अन्न १०० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये तयार केले आहे. अंतराळवीरांसाठी अन्न तयार करणारी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-डिफेन्स टेक्नॉलॉजीज ही इस्रोचा एक भाग आहे.6 / 7ही पाकिटे अंतराळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले गेली आहेत. विशेष म्हणजे या अन्नात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत. हे अन्न १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ रूम टेम्परेचरवर ठेवता येते. हे पदार्थ आमच्या प्रस्तावित गगनयान मोहिमेचा एक भाग आहेत. म्हणून, आम्ही इस्रोला दिलेल्या अन्न यादीच्या आधारे, शुक्ला यांनी हे तीन पदार्थ निवडले होते असं जेवण तयार करणाऱ्या संस्थेने सांगितले.7 / 7वर्षातून एकदा तो लखनऊला येतो आणि आमच्यासोबत एक महिना राहतो आणि आम्हाला फिरायला घेऊन जातो. त्याला जेवणात सर्वकाही आवडते. पण गेल्या ५-६ वर्षांपासून तो घरी बनवलेले जेवण खात नाही. त्याला अंतराळवीर जेवतात त्यासारखेच काहीतरी खावं लागतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने घरी बनवलेले जेवण आणि मिठाई खाणे बंद केले आहे, असं शुभांशू शुक्ला यांच्या आईने सांगितले.