शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:12 IST

1 / 10
देशाच्या उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक येत्या ९ सप्टेंबरला होणार आहे. एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीने या निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एनडीएने सी.पी राधाकृष्णन आणि विरोधकांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डींना उमेदवारी दिली आहे. आता यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारावर निशाणा साधला आहे.
2 / 10
गृहमंत्री अमित शाह यांनी उपराष्ट्रपति‍पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डींवर हल्ला केला आहे. रेड्डींनी सलवा जुडूम फेटाळले, आदिवासींच्या रक्षणाचे अधिकार संपवले त्याचमुळे देशात नक्षलवाद आणखी फोफावला असं सांगत डाव्या विचारधारेचे असल्याने सुदर्शन रेड्डींना विरोधकांनी त्यांचा उमेदवार बनवला असेल असा आरोप शाहांनी केला.
3 / 10
शाह यांनी याआधी शुक्रवारीही सुदर्शन रेड्डी यांच्यावर नक्षलवादाचे समर्थन केल्याचा आरोप लावला होता. जर सलवा जुडूम यावर त्यांनी निर्णय दिला नसता, तर देशात डाव्यांचा उग्रवाद २०२० च्या आधीच संपुष्टात आला असता असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दावा केला आहे.
4 / 10
शाह यांनी म्हटलं की, काँग्रेसने उपराष्ट्रपति‍पदासाठी जे उमेदवार निवडले त्यामुळे पक्षाने केरळमध्ये जिंकण्याची शक्यता आणखी कमी केली. सुदर्शन रेड्डी असे व्यक्ती आहेत, ज्यांनी नक्षलवादाला मदत केली. त्यांनी सलवा जुडूमवर निर्णय दिला. रेड्डी यांच्यावर डाव्या विचारधारेचा पगडा आहे. त्याच विचारधारेने सलवा जुडूमविरोधात निर्णय दिला होता.
5 / 10
रेड्डी यांनी आदिवासींच्या स्वसंरक्षणासाठी अस्तित्वात असलेला कायदा त्यांनी नाकारला. त्यामुळे देशात नक्षलवाद २ दशकाहून जास्त फोफावला असा आरोप शाहांनी केला. त्याशिवाय सुदर्शन रेड्डींची निवड का केली, त्याचे उत्तर राहुल गांधी यांना द्यावे लागेल. डावी विचारधारा हीच पात्रता उमेदवार निवडीसाठी असावी असं सांगत शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
6 / 10
केरळ नक्षलवादाचा मार सहन करत आहे, इथली जनता आवश्यक पाहत असेल, काँग्रेसने डाव्या विचारधारेच्या दबावात येऊन नक्षलवादी समर्थक उमेदवार मैदानात उतरवला आहे असं अमित शाह यांनी म्हटले. सत्ताधारी पक्षाकडून उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तामिळनाडूतील ज्येष्ठ भाजपा नेत सी.पी राधाकृष्णन यांना उमेदवारी घोषित केली आहे.
7 / 10
काय आहे सलवा जुडूम खटला? सलवा जुडूम खटला छत्तीसगडशी निगडित आहे. २००५ ते २०११ या काळात नक्षलवाद आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष वाढला होता. सलवा जुडूम एक अभियान होते, जे छत्तीसगड सरकार आणि काही स्थानिक लोकांनी मिळून २००५ साली सुरू केले होते. त्या अभियानाचा हेतू नक्षलवाद संपवणे हा होता.
8 / 10
सलवा जुडूम या अभियानात आदिवासी युवकांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून समाविष्ट केले होते. नक्षलवादविरोधी लढाईत त्यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले होते. कारण या अभियानात अनेक लोक विस्थापित झाले, काही मारले गेले. जेव्हा हा खटला सुप्रीम कोर्टात पोहचला तेव्हा सुदर्शन रेड्डी यांच्या खंडपीठाने हे अभियान बेकायदेशीर आणि असंविधानिक मानले.
9 / 10
अमित शाह यांनी केलेल्या आरोपानंतर माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांनीही उत्तर दिले. मी थेटपणे या मुद्द्यावरून अमित शाहांना बोलू शकत नाही. संविधानिक कर्तव्ये आणि जबाबदारी वैचारिक मतभेद बाजूला सारून प्रत्येक नागरिकाचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्तीचे रक्षण करणे हा आहे. मी निर्णय लिहिला, परंतु हा निर्णय माझा नव्हता तर सुप्रीम कोर्टाचा होता असं त्यांनी सांगितले.
10 / 10
त्याशिवाय अमित शाह यांनी या खटल्याचा संपूर्ण ४० पानी निकाल वाचायला हवा. त्यांनी हा निर्णय वाचला असता तर कदाचित ही टिप्पणी केली नसती असा टोलाही सुदर्शन रेड्डी यांनी शाहांना लगावला. मात्र उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या उमेदवाराला टार्गेट केले आहे.
टॅग्स :Amit Shahअमित शाहINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीnaxaliteनक्षलवादीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा