असे काय घडले? नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:59 PM2021-07-31T14:59:55+5:302021-07-31T15:06:57+5:30

Corona Positive Groom, bride waiting at home: पोलिसांनी सीमेवरच अडविल्याची माहिती मुलीकडच्यांना मिळाली तेव्हा त्यांनी सीमेवर धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा त्या काय घडले हे समजावले तेव्हा ते नाईलाज असल्य़ाने शांत झाले. असे नेमके काय घडले....

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यातून उत्तराखंडला नवरीला आणण्यासाठी जात असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी बॉर्डवरच रोखले. पोलिसांनी तपासणी केल्यावर संपूर्ण वरातीसह नवरदेवालाही उत्तराखंडमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. (Groom Report came corona Positive; varat stopped by police and sent back)

जेव्हा याची माहिती मुलीकडच्यांना मिळाली तेव्हा त्यांनी सीमेवर धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा त्या काय घडले हे समजावले तेव्हा ते नाईलाज असल्य़ाने शांत झाले. असे नेमके काय घडले....

पीलीभीत शहराला लागून असलेल्य़ा चंदोई गावातून वरात उत्तराखंडच्या खटीमाला निघाली होती. दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या परवानगीनुसार वेळेवर वरात निघाली. यामध्ये 40 ते 45 लोक होते. सर्वांनी मास्क घातले होते, सॅनिटायझर वापरले होते. सर्व गाईडलाईन पाळल्या जात होत्या. मात्र, उत्तराखंडच्या सीमेवर पोहोचताच पोलिसांनी वरात थांबविली.

युपी-उत्तराखंडच्या सीमेवर तैनात असलेल्या आरोग्य विभागाच्या टीमने तपासणी सुरु केली. आधी नवरदेवाची कोरोना टेस्ट करण्यात आली. जेव्हा त्याचा रिपोर्ट आला तेव्हा सारे हैरान झाले. वरातीची कोरोना टेस्ट सोड नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे सोबतच्या 40 जणांमध्येही सन्नाटा पसरला.

नवरदेवाच्या गाडीत जे बसले होते त्यांनाही घाम फुटला. अनेकजणांनी नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच तेथून काढता पाय घेतला. उत्साहाचे वातावरण एकदम सन्नाट्यामध्ये पसरले. प्रत्येकाच्या मनात धाकधूक सुरु झाली.

यानंतर पोलिसांनी वरातीला मागे जाण्यास सांगितले. तसेच 14 दिवसांनी जेव्हा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईल तेव्हाच उत्तराखंडमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले.

तिकडे वरात अजून कशी आली नाही, म्हणून मुलीच्या आणि तिच्या बापाच्या मनात घालमेल सुरु झाली. सीमा जवळच होती. त्यांनी फोन केला तेव्हा त्यांना वरातीला सीमेवरच रोखल्याचे समजले. मुलीकडच्यांनी लगेचच सीमेवर धाव घेतली.

पोलिसांना परवानगी असताना अशी कशी वरात रोखली असे विचारू लागले. आपली मुलीची बाजू, थोडे नमते घ्या म्हणून नवरीच्या बापाने हात पसरले. परंतू पोलिसांनी नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगताच नाईलाज झाला. नवरीकडचेही शांत झाले.

नवरदेव कोरोना संक्रमित झाल्यावर आता वरात्यांमध्ये टेन्शन आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाला नवरदेव कोरोना बाधित असल्याचे आणि त्यांच्यासोबत 40-45 जण वराती असल्याचे कळविण्यात आले आहे.

यामुळे गावी परतताच या वऱ्हाड्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच या वऱ्हाडींना क्वारंटाईन केले जाणार आहे.