By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:06 IST
1 / 6रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं अँटिलिया निवासस्थान हे सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरलेलं आहे. मुंबईतील उच्चभू भागात असलेली ही आलिशान इमारत ही जगातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी एक आहे. दरम्यान, एका व्हिडीओमधून अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाच्या अंतर्भागातील आतापर्यंत न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. 2 / 6मुकेश आणि नीता अंबानी यांच्या या निवास्थानाच्या अंतर्भागातील अत्यंत नयनरम्य नजारा, भव्यदिव्यता पाहून लोक अवाक् झाले आहेत. अँटिलिया निवासस्थानामधील हा अत्यंत खास व्हिडीओ प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टर यांनी शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. 3 / 6या व्हिडीओमध्ये नीता अंबानी यांनी सुंदर अशी ऑरेंज कलरची साडी परिधान केली आहे. मात्र या व्हिडीओमध्ये लोकांचं लक्ष हे व्हिडीओमध्ये दिसत असलेली घरातील सुरेख सजावट, आलिशान झुंबर, बाल्कनीमधून दिसणारा समुद्राचा नजारा, प्रत्येक कोपऱ्यात दिसणारा श्रीमंती थाट पाहून प्रत्येकाचं भान हरपत आहे. 4 / 6अँटिलियामधील सर्वात मोठी खास बाब म्हणजे इथल्या मोठमोठ्या काचेच्या भिंती आहे. त्यामधून या उंच इमारतीवरून बाहेरचं सुंदर दृश्य दिसतं. तसेच घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाशही येतो. या काचेच्या भिंतींमधून मुंबईतील गगनचुंबी इमारती आणि अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. 5 / 6याशिवाय अँटिलियामध्ये संगमरमरच्या फरश्या बसवण्यात आल्या आहे, त्यामुळे या निवासस्थानाचं सौंदर्य आणखीनच वाढलं आहे. एवढंच नाही तर नीता अंबानी यांनी आपल्या घराला भारतीय कला आणि आधुनिक स्टाईल मिळून सजवलं आहे. 6 / 6या व्हिडीओमध्ये अँटिलियाच्या बाल्कनीचंही सुंदर दृष्य दिसतं. येथून समुद्र आणि सूर्यास्ताचं दृश्य खूप विलोभनीय असं दिसतं. तसेच बाल्कनीमध्ये मोठमोठ्या कुंड्यांमध्ये झालं लावलेली आहेत. त्यामुळे या बाल्कनींना टेरेस गार्डनचा लूक आला आहे.