संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 22:44 IST2025-07-21T22:27:26+5:302025-07-21T22:44:06+5:30

Vice President Jagdeep Dhankar Resign, Article 67(A): संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होताच धनखड यांचा राजीनामा....

Vice President Jagdeep Dhankar Resign, Article 67(A): - Marathi News | Vice President Jagdeep Dhankar Resign, Article 67(A): | Latest national Photos at Lokmat.com

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात कलम ६७ (अ) चा उल्लेख केला आहे.

धनखड यांनी लिहिले आहे की प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.

त्यांनी लिहिले, "संसदेतील सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला जिव्हाळा आणि प्रेम नेहमीच माझ्या स्मरणात राहील. लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल मी मनापासून आभारी आहे."

"या काळात भारताच्या प्रगती आणि विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हे माझे भाग्य होते. हे पद सोडताना भारताच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान वाटतो," असेही त्यांनी आपल्या निवेदनात लिहिले.

धनखड यांनी राजीनामा देताना कलम ६७ (अ) चा उल्लेख केला. संविधानातील कलम ६७ उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळाशी संबंधित आहे आणि कलम ६७ च्या कलम अ नुसार, उपराष्ट्रपतींना काही विशेष अधिकर दिले आहेत.

संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींना स्वाक्षरीचे एक पत्र देऊन पदाचा राजीनामा देऊ शकतात. तर, कलम ६७ च्या दुसऱ्या कलमानुसार, उपराष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही उत्तराधिकारी पद स्वीकारेपर्यंत पदावर राहू शकतात.