शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

देवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 16:32 IST

1 / 8
एकीकडे कोरोनाचे संकट असताना आता देशात काही भागांत उन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
2 / 8
उष्णतेमुळे मानवासह सृष्टीतील इतर जीवजंतूंना उष्णतेचा त्रास होत आहे. इतकेच नाही तर उष्णतेमुळे देवही हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 8
तापमान वाढल्यामुळे वाराणसीतील मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी देवाला चक्क कोल्ड्रिंग आणि चॉकलेट्सचा नैवेद्य दाखवायला सुरुवात केली आहे.
4 / 8
'आज तक'ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊमुळे देशातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद आहे. मात्र, या मंदिरांमध्ये अगदी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थित देवांची नित्य पूजा करण्यात येत आहे.
5 / 8
उत्तर प्रदेशातील वाराणसी, काशी येथील उष्णतेमुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येथील मंदिरांमध्ये उन्हाची झळ बसत आहे. त्यामुळे ऊन्हाचा त्रास देवाला होऊ नये, यासाठी येथील पुजाऱ्यांनी देवाला दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्यात बदल केल्याचे दिसून येत आहे.
6 / 8
काशी येथील बाबा बटुक भैरव मंदिरात कोल्ड्रिंग आणि चॉकलेट्सचा नैवेद्य दाखविण्यात येत आहे. भगवान शंकराच्या आठ रुपांपैकी एक असलेल्या या मंदिरात शिवशंकराच्या बाल स्वरुपाची पूजा करण्यात येते.
7 / 8
देवाला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून बटुक भैरव मंदिरात एअर कंडिशनर, पंखे आणि एक्झॉस्ट फॅनही लावण्यात आले आहेत.
8 / 8
अशीच व्यवस्था येथील इतर मंदिरात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग्स :TemperatureतापमानUttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरVaranasiवाराणसी