IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:14 IST2025-11-07T15:03:55+5:302025-11-07T15:14:33+5:30
IPS Aakash Shrishrimal : आयपीएस अधिकारी आकाश श्रीश्रीमल यांची ही यशोगाथा आज अनेक यूपीएससी इच्छुकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

कबीरधामचे पहिले आयपीएस अधिकारी आकाश श्रीश्रीमल यांनी ऑल इंडिया ९४ वा रँक मिळवून फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं नाही तर संपूर्ण छत्तीसगडमधील यूपीएससी इच्छुकांसाठी एक आदर्शही निर्माण केला.

२०२१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आकाश श्रीश्रीमल यांची ही यशोगाथा आज अनेक यूपीएससी इच्छुकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. अधिकारी होण्याचा प्रवास थोडा कठीण होता, परंतु आयपीएस अधिकारी बनून आकाश श्रीश्रीमल यांनी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न साकार केलं आहे.

भावंडांमध्ये सर्वात लहान असलेले आयपीएस आकाश श्रीश्रीमल सध्या छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील भानु प्रतापपूर येथे एएसपी म्हणून कार्यरत आहेत. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना, आकाशने देश आणि समाजाची सेवा करायचं ठरवलं होतं.

आकाशने दुसऱ्या प्रयत्नातच यूपीएससी उत्तीर्ण होऊन ऑल इंडिया ९४ वा रँक मिळवला. आकाशने यूपीएससीची तयारी करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर राहण्याऐवजी त्याने त्याच्याशी मैत्री केली.

व्हॉट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अकाउंट तयार केलं आणि इंटरनेटचा वापर त्यांची तयारी पूर्ण करण्यासाठी केला. खूप मेहनत केली.

आकाशने एका मुलाखतीत खुलासा केला की त्याने केवळ कोचिंगवर अवलंबून राहण्याऐवजी टॉपर्सच्या नोट्स, ग्रुप डिस्कशन आणि व्हिडिओ पाहण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्याने प्रिलिम्स आणि मेन्ससाठीची तयारी एकत्र केली.

आयपीएस आकाश श्रीश्रीमल आज कबीरधामचा पहिला तरुण आयपीएस अधिकारी आहे. कवर्धा येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्याने एनआयटी रायपूरमधून शिक्षण पूर्ण केलं. तेव्हाच यूपीएससी उत्तीर्ण करण्याची आवड निर्माण झाली.

एका प्रकल्पादरम्यान, त्याने ग्रामीण भारताचे निरीक्षण केले. त्याच क्षणी आकाशच्या मनात ग्रामीण भारतासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली आणि हे केवळ अधिकारी बनूनच पूर्ण होऊ शकत होतं.

आकाशचे वडील उद्योगपती होते, आई एलआयसी एजंट आहे. आकाशला पाच मोठ्या बहिणी आहेत, त्या सर्व आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. एक बहीण सीए आहे.

आयपीएस आकाश श्रीश्रीमलची पत्नी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुग्धा अग्रवालने विविध शॉर्ट फिल्म आणि सीरीजमध्ये काम केलं आहे.

२ डिसेंबर २०२४ रोजी या जोडप्याने जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

















