80 वर्षांच्या आजीबाईंची चित्रकलेत कमाल; इटलीतील प्रदर्शन पाहून तुम्हीही कराल सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:26 IST2019-10-05T14:45:18+5:302019-10-05T15:26:49+5:30

कला माणसाला समृद्ध करते याचं उत्तम उदाहरण मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे.
उमरिया जिल्ह्यातील लोढा या छोट्याशा गावातील जोधईया बाई बैगा या महिलेच्या चित्रांनी सर्वांनाच भूरळ पाडली आहे.
विशेष म्हणजे जोधईया बाई बैगा याचं वय 80 वर्षे असून सर्वत्र त्यांच्या चित्रांचं भरभरून कौतुक होत आहे.
जोधईया बाई या चित्रकार असून इटलीमध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
इटलीच्या मिलान शहरामध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत चित्रांचे प्रदर्शन आहे.
जोधईया बाई यांच्या चित्रांचं याआधी मध्य प्रदेशच्या जनजातीय संग्रहालय, शांति निकेतन, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि मानस संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.
पतीच्या मृत्यूनंतर मुलांची जबाबदारी असल्याने पारंपरिक चित्र काढायला सुरुवात केल्याची माहिती जोधईया बाई यांनी दिली आहे.