Torn Note Exchange: एकापेक्षा जास्त फाटक्या नोटा असतील तर काय? RBI कडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:27 AM2021-08-26T08:27:57+5:302021-08-26T08:37:23+5:30

how Torn Note Exchange: अनेकदा आपल्याकडे चुकून फाटक्या वा जीर्ण झालेल्या नोटा येतात. मग आपल्याकडच्या या फाटक्या वा जीर्ण झालेल्या नोटा खपवण्याचा खटाटोप सुरू होतो. त्यापेक्षा सोपा उपाय बँकेत असतो.

अनेकदा आपल्याकडे चुकून फाटक्या वा जीर्ण झालेल्या नोटा येतात. मग आपल्याकडच्या या फाटक्या वा जीर्ण झालेल्या नोटा खपवण्याचा खटाटोप सुरू होतो.

काही जण थेट बँकेत जाऊन नोटा बदलून आणतात. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने या प्रकारच्या नोटांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या मते ज्या नोटांचा काही भाग फाटला आहे किंवा ज्यांचे दोन वा अधिक तुकडे झाले आहेत, त्या म्हणजे फाटक्या नोटा, अशा प्रकारच्या फाटक्या नोटा राष्ट्रीयीकृत बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलता येतात.

या नोटा ज्या स्थितीत आहेत त्या तशा स्वीकारणे आणि बदलून देणे बँकेला बंधनकारक असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

लघुवित्त बँका आणि पेमेंट बँकाही फाटक्या वा सदोष नोटा बदलून देऊ शकतात.

एखाद्याकडे जर मोठ्या प्रमाणात फाटक्या नोटा असतील तर त्या व्यक्तीला नोटा बदली करून घेण्यासाठी स्वतःचा वैयक्तिक तपशील द्यावा लागतो.

वैयक्तिक तपशिलात व्यक्तीचे नाव, बँक अकाउंट नंबर, आयएफएससी नंबर, शाखेचे नाव इत्यादीचा समावेश असतो. पाच हजार रुपयांपुढील मूल्याच्या फाटक्या नोटा असतील तर त्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्ट शाखेत जमा होतात.

ज्या व्यक्तीने त्या आणून दिल्या त्या व्यक्तीच्या बँक खात्यात ३० दिवसांत संबंधित रक्कम जमा करणे बँकेला बंधनकारक असते. बँकांकडे मोठ्या प्रमाणात फाटक्या नोटा जमा होत असतात.

फाटक्या नोटा जमा करण्यासाठी काही एजन्सी देखील देण्यात आलेल्या आहेत. काही दुकानांमध्ये फाटक्या नोटा जमा करून घेत बदलून दिल्या जातात.

एटीएम मधून आलेली फाटकी नोट त्या बँकेच्या शाखेतून बदली करता येते.

Read in English