शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TTD: ठेवी, सोनं, जमीन, तिरुपती बालाजीच्या खजिन्यात काय काय? देवस्थानाने जाहीर केली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:06 PM

1 / 7
तिरुपती बालाजी देवस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराला मिळणाऱ्या मोठ्या देणग्या आणि मंदिराच्या संपत्तीची नेहमीच कुतूहलाने चर्चा होत असते.
2 / 7
दरम्यान, तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD)ने हल्लीच त्यांच्याकडील एकूण संपत्ती आणि मालमत्तेचा आकडा जाहीर केला आहे. त्यानुसार या देवस्थानाकडे देशभरात मिळून ९६० संपत्ती आहेत. त्यांची एकूण किंमत तब्बल ८५ हजार कोटी रुपय एवढी आहे. दरम्यान, हा सरकारी आकडा आहे, तर या संपत्तीचं बाजारमूल्य जाहीर आकड्यापेक्षा किमान दीडपट म्हणजेच सुमारे दोन लाख कोटी रुपये एवढी असू शकते.
3 / 7
गेल्या काही वर्षांत टीटीडीने पहिल्यांदाच टीटीडीने अधिकृतरीत्या आपल्याकडीन संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे.
4 / 7
तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या ताजा आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांपासून मंदिराच्या हुंडीमध्ये दानाच्या रुपात मिळणाऱ्या रकमेत सातत्याने वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत हुंडीच्या माध्यमातून एकूण दानाची रक्कम ७०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
5 / 7
आपल्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच टीटीडीने अमेरिकेसारख्या देशासह भारतातील विविध भागांमध्ये मंदिरं बांधली आहेत.
6 / 7
टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी सांगितले की, मंदिराची ट्रस्ट देशभरात सुमारे ७ हजार १२३ एकर जमिनीवर नियंत्रण ठेवते. त्यांनी सांगितले की, १९७४ ते २०१४ या काळात वेगवेगळ्या सरकारच्या कार्यकाळात ट्रस्टने अपरिहार्य कारणांमुळे ११३ संपत्तींचा निपटारा केला आहे. मात्र अध्यक्षांनी या संपत्तींची विक्री करण्याबाबतचं कारण सांगितलेलं नाही.
7 / 7
टीटीडीच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानकडे विविध बँकांमध्ये मिळून तब्बल १४ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. तर सुमारे १४ टन एवढं सोनं आहे. आता आपल्याकडील जमिनीसह सर्व संपत्तीचं मूल्यांकन केल्याने मंदिर अनेक पटीने श्रीमंतं झालं आहे.
टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशIndiaभारत