शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:30 IST

1 / 10
भारत आणि रशियाची मैत्री सर्व परिचित आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकेने भारताकडे तिरप्या नजरेने पाहण्याचा अथवा आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा रशियाने भारताची बाजू घेतली, भारतासोबत उभाराहिला.
2 / 10
याशिवाय, रशियासोबत युद्ध सुरू असलेल्या युक्रेनसोबतही भारताचे संबंध संतुलित आहेत. कारण, या युद्धासंदर्भात आपण तटस्थ आहोत, असे भारत नेहमीच म्हणत आला आहे.
3 / 10
रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत.
4 / 10
पंतप्रधान मोदींनी दिलंय आमंत्रण - भारत आणि युक्रेनच्या नात्याचे एक नवे चित्र शनिवारी बघायला मिळाले. युक्रेनच्या स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, दिल्लीचा कुतुब मीनार युक्रेनी झेंड्याच्या रंगात चमकताना दिसला. दरम्यान, भारत आणि युक्रेन यांच्यात भविष्यातील धोरणात्मक भागिदारीच्या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे युक्रेनचे राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी म्हटले आहे.
5 / 10
पोलिशचुक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. दोघांकडूनही तारीख निश्चित करण्यावर काम सुरू आहे. एवढेच नाही तर, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंधांसाठी एक मोठी उपलब्धी असेल, असेही राजदूत पोलिशचुक यांनी म्हटलेआहे.
6 / 10
वर्षाच्या शेवटी पुतिन यांचा दौरा - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी, पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे म्हटले होते. याशिवाय, रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सनेही आपल्या वृत्तात, २०२५ च्या अखेरीस पुतिन यांचा भारत दौरा होणार असल्याचे म्हटले आहे.
7 / 10
महत्वाचे म्हणजे, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. यामुळे त्यांनी भारतावर 50% पर्यंत टॅरिफ वाढवला आहे. असे असतानाच, पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, अमेरिकेचा हा निर्णय अयोग्य, अनावश्यक आणि तर्कहीन असल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.
8 / 10
वोलोदिमिर झेलेन्स्की ही येणार भारत दौऱ्यावर - याशिवाय, द गार्डियनने, प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या एका वृत्तानुसार, ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात पुढच्या टप्प्यातील शांतता चर्चेत थेट सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आधी अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय भेटावे, अशी त्यांची इच्छा आहे, असे म्हटले आहे...
9 / 10
दरम्यान, भारतातील युक्रेनचे राजदूत पोलिशचुक यांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंधांसाठी एक मोठी उपलब्धी असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
10 / 10
ये नया हिंदुस्तान है...!
टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्धTrade Tariff Warटॅरिफ युद्ध