Draupadi Murmu: राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश व्हाईसरॉयच्या शाही खोलीत नाही तर इथे राहतात भारताचे राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:33 PM2022-07-25T19:33:09+5:302022-07-25T19:36:14+5:30

Rashtrapati Bhavan Facts: द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. आता त्यांचे अधिकृत निवासस्थान हे रायसिना हिल्समधील राष्ट्रपती भवन हे असेल. या वास्तूचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे. हे भवन १९१२ मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. तसेच त्याचे काम पूर्ण होण्यास १९ वर्षे लागली. येथील प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक आहे. या वास्तूबाबतच्या काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे...

द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. आता त्यांचे अधिकृत निवासस्थान हे रायसिना हिल्समधील राष्ट्रपती भवन हे असेल. या वास्तूचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे. हे भवन १९१२ मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. तसेच त्याचे काम पूर्ण होण्यास १९ वर्षे लागली. येथील प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक आहे. या वास्तूबाबतच्या काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे...

आधी इंग्रजांनी कोलकाता येथे देशाची राजधानी स्थापन केली होती. मात्र १९११ मध्ये ब्रिटिशांनी राजधानी दिल्लीला हलवली. त्यानंतर १९१२ मध्ये रायसिना हिल्स येथे राष्ट्रपती भवनाचं काम सुरू झालं. अखेर १९ वर्षांनी १९३१ मध्ये ते बांधून पूर्ण झालं.

ब्रिटिश काळात ही वास्तू व्हाईसरॉय हाऊस म्हणून ओळखली जात असे. ती ब्रिटिश व्हाईसरॉयसाठी बांधण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर तिचं नामकरण राजभवन असं करण्यात आलं. तसेच डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळात त्याचं नाव राष्ट्रपती भवन असं करण्यात आलं.

राष्ट्रपती भवनामध्ये राहणारे पहिले भारतीय व्यक्ती पहिले राष्ट्रपती हे डॉ. राजेंद्र प्रसाद हे नव्हे तर सी. राजगोपालचारी होते. राजेंद्र प्रसाद हे २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपती बनले. मात्र सी राजगोपालचारी यांनी २१ जून १९४८ रोजी देशाचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली होती. तेव्हा राष्ट्रपती भवनाचं नाव राजभवन असं होतं.

राजगोपालचारी हे या इमारतीत राहणारे पहिले भारतीय होते. मात्र ते ब्रिटिश व्हाईसरॉयसाठी बांधण्यात आलेल्या आलिशान खोलीत राहिले नाहीत. त्यांना या भवनातील राजेशाही मोठ्या खोल्या आवडल्या नाहीत. त्यामुळे ते तेव्हाच्या गेस्ट हाऊसमधील एका छोट्या खोलीत राहिले. हीच खोली आता राष्ट्रपती भवनातील परिवार विंग म्हणून ओळखला जातो.

दरम्यान, राजगोपालचारी यांनी जी परंपरा सुरू केली, ती आजपर्यंत सुरू आहे. राजगोपालचारी यांच्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासह आतापर्यंतच्या राष्ट्रपतींनी ही परंपरा पाळली आहे. आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींनी वास्तव्यासाठी ब्रिटिश व्हाईसरॉयच्या आलिशान खोलीऐवजी राजगोपालचारी यांनी ज्या खोलीत वास्तव्य केले त्याच खोलील वास्तव्य केलं आहे.

काही काळानंतर व्हाईसरॉय यांच्या आलिशान खोलीला गेस्ट विंग बनवण्यात आले. आता तिथे इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळ वास्तव्य करतात.