शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हजार रुपये घ्या, पण मला खाली उतरवा; पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:35 PM

1 / 6
पर्वतीय प्रदेशात किंवा समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पॅराग्लायडिंगचा थ्रिलिंग अनुभव घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र प्रत्यक्षात पॅराग्लायडिंग करताना त्यातल्या काही जणांची फे फे उडते. असाच एका पॅराग्लायडिंग करायला गेलेल्या तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
2 / 6
हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील खजियार येथून समोर आला आहे. येथे एक तरुणीने पॅराग्लायडिंगसाठी तयारी केली. मात्र ती जसजशी हवेत उंचावर गेली. तशी तिला भीती वाटू लागली. भीतीमुळे ती ओरडू लागली, रडू लागली. तसेच पायलटला खाली उतरवण्यासाठी विनंती करू लागली. मात्र पायलट तिचा उत्साह वाढवत तिला ग्लायडिंगचा आनंद घेण्याचा सल्ला देत होता.
3 / 6
मात्र ग्लायडिंग करताना ही तरुणी एवढी घाबरली की, तिने भीतीमुळे आपले डोळे बंद केले. पायलटने धीर दिल्यानंतरही तिची भीती कमी झाली नाही. ती वारंवार मला खाली उतरवा, असेच सांगत होती.
4 / 6
या तरुणीचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला २०१९ मधील त्या व्हिडीओची आठवण झाली. त्या व्हिडीओमध्ये पॅराग्लायडिंगदरम्यान घाबरलेला एक तरुण स्वत:लाच शिव्या देऊ लागला होता. तसेच पायलटला खाली उतरण्यासाठी विनंती करू लागला होता. त्या व्हिडीओने लोकांना खूप हसवले होते. आता हा व्हिडीओ पाहूनही लोकांना हसू आवरत नाही आहे.
5 / 6
ही तरुणी तिच्याकडील गो प्रो घेऊन ग्लायडिंग करायला गेली होती. त्यामुळे तिची भीतीने उडालेली गाळण व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, जमिनीवर उतरत असताना ती पुन्हा घाबरली. यावेळी एक हजार रुपये घ्या, पण मला काही करून खाली उतरवा, अशी विनंती तिने केली.
6 / 6
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओची तुलना २०१९ मधील विनीत साहूच्या व्हिडीओशी केली जात आहे. भावा ५०० रुपये जास्त घ्या, मात्र मला खाली उतरवा, असे त्या व्हिडीओत साहू सांगत होता.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Paraglidingपॅराग्लाइडिंगHimachal Pradeshहिमाचल प्रदेश