शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अचानक आवाज आला, जमीन दुभंगली, अन् महिला जिवंत गाडली गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 8:25 AM

1 / 6
एक महिला रस्त्याने जात असताना अचानक मोठा आवाज होऊन जमीन दुभंगून सदर महिला जमिनीत जिवंत गाडली गेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार झारखंडमधील धनबाग येथे घडला आहे.
2 / 6
धनबादमधील झरिया परिसरातील बस्ताकोला येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी एक ३५ वर्षीय महिला कल्याणी देवी शौचासाठी जात होती. तेवढ्यात अचानक तिच्या पायाखालील जमीन मोठा आवाज होऊन दुभंगली. त्यानंतर ही महिला जिवंत जमिनीत गाडली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. हा धूर विषारी गॅसमुळे आल्याचे सांगण्यात येत आहे.
3 / 6
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. महिलेच्या कुटुंबीयांनी दोरीच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. जमिनीमधून अचानक गॅस बाहेर आल्या आणि त्यामुळे जमीन फाटून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको करत वाहतूक अडवली. तसेच घटनास्थळावर तत्काळ मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली.
4 / 6
स्थानिक लोकांनी सांगितले की, ज्यावेळी महिला खड्ड्यात पडती तेव्हा ती जिवंत होती. तसेच मगतीसाठी आरडाओरडा करत होती. मात्र स्थानिकांनी दोरी टाकून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिचा आवाज येणं बंद झालं होतं.
5 / 6
त्यानंतर घटनास्थळावर प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिथे जमीन दुभंगली होती. तिथून मोठ्या प्रमामावर विषारी वायू बाहेर येत होता. दरम्यान, या परिसरातील मोठ्या भागात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 / 6
सध्या या घटनेनंचर प्रशासनाने मृत महिलेच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, मुलांच्या शिक्षणाची सोय आणि पतीला नोकरी दिली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार झरियाच्या अनेक भागांत जमिनीखाली अनेक दशकांपासून आग धुमसत आहे. तसेच या परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात.
टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातIndiaभारत