शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

IAS Moin Ahmed : संघर्ष, जिद्द आणि यश! बस चालकाच्या मुलाने रचला इतिहास; ३ वेळा नापास, चौथ्या प्रयत्नात IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:59 IST

1 / 10
देशातील लाखो तरुण आयएएस (IAS) होण्याचं स्वप्न पाहतात, परंतु हे स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं. यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संयम आणि प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट जटपुरा गावातील मोईन अहमद यांची आहे.
2 / 10
मोईन यांनी आर्थिक अडचणी आणि वारंवार मिळणाऱ्या अपयशावर मात करत आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.मोईन अहमद हे मुरादाबादमधील दिलारी परिसरातील जटपुरा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगायचे.
3 / 10
वडील वली हसन उत्तर प्रदेश रोडवेजमध्ये कंत्राटी बस चालक होते. घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा वातावरणात शिक्षण सुरू ठेवणं हेच मोठं आव्हान होतं पण मोईन यांनी लहानपणापासूनच मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
4 / 10
मोईन यांचं स्वप्न यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचं होतं. मात्र या परीक्षेची तयारी करणं सोपं नसतं, कारण यासाठी महागड्या कोचिंग क्लासेसची आणि चांगल्या संसाधनांची गरज असते.
5 / 10
मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये शिकण्यासाठी मोईन यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि स्वतः मेहनत करून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
6 / 10
मोईन यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली, पण सुरुवातीला त्यांना सलग तीन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, तिन्ही वेळा ते 'पूर्व परीक्षा' देखील उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.
7 / 10
इतक मोठं अपयश कोणाचंही मनोधैर्य खचवू शकतं, पण मोईन यांनी या अपयशाला आपली कमजोरी न मानता त्यातून सुधारणा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या चुका समजून घेतल्या आणि अभ्यासाची पद्धत बदलली.
8 / 10
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मोईन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला आले. येथे त्यांनी एका सायबर कॅफेमध्ये नोकरी सुरू केली, जेणेकरून ते आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलू शकतील.
9 / 10
नोकरी करूनही ते दररोज ७ ते ८ तास अभ्यास करायचे. त्यांनी वेळेचे योग्य नियोजन केले आणि पूर्ण निष्ठेने आपली तयारी सुरू ठेवली.
10 / 10
सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाचे फळ अखेर २०२२ मध्ये मिळालं. मोईन यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी संपूर्ण भारतात २९६ वा रँक (AIR 296) पटकावला.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी