शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निसर्गाच्या कुशीत वसलेलं सिक्कीम एअरपोर्ट; मन होईल प्रसन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:52 PM

1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं आहे.
2 / 8
सिक्किमवासीयांचं विमानतळाचं स्वप्न आज साकार झालं आहे.
3 / 8
2009 मध्ये या विमानतळाचं काम सुरू झालं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला.
4 / 8
सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेलं आहे.
5 / 8
समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे.
6 / 8
रविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
7 / 8
पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे.
8 / 8
एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.
टॅग्स :sikkimसिक्किमAirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदी