म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
धक्कादायक ! कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत तरीही 'तो' पॉझिटीव्ह, डॉक्टरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 17:32 IST
1 / 10 केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली. यामध्ये गेल्या २४ तासांतील सापडलेले नवे रुग्ण, मृत्यू यांची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी कोरोनाची भीती काहीशी दूर करणारी ठरणार आहे. 2 / 10भारतात आतापर्यंत एकूण 24,506 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 5063 जण बरे झाले असून ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या विविध राज्यांमध्ये 18,668 जण उपचार घेत आहेत. 3 / 10गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १४२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 4 / 10मात्र, दुसरीकडे एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे, ती म्हणजे कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. 5 / 10विशेष म्हणजे वाराणसीची यात्रा करुन ५० दिवस उलटले तरीही कुठलीही लक्षणे या व्यक्तीमध्ये आढळून आली नाहीत. मात्र, ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. 6 / 10२० एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीला वाराणसीच्या एसएसपी यांनी जमातींच्या यात्रेसंबंधी विचारणा केली होती, यावरुन यात्रेदरम्यान हा युवक एका तबलिगी जमातीच्या बाजूला बसल्याचे सिद्ध झाले होते. 7 / 10त्यानंतर, या युवकाची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आल, त्यावेळी ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर, युवकाच्या कुटुंबातील १८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 8 / 10आता, या युवकाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. तर, ती व्यक्ती काम करत असलेल्या वीमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलंय. 9 / 10आता, या युवकाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. तर, ती व्यक्ती काम करत असलेल्या वीमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलंय. 10 / 10पोलिसांकडून या युवकाच्या संपर्कात आलेल्या ५० ते ६० व्यक्तींची स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे. त्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांनाही क्वारंटाई करण्यात येईल.