शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1500 रुपयांत सी-प्लेनमधून सफर, SpiceJet ची ऑफर!

By ravalnath.patil | Published: October 28, 2020 5:56 PM

1 / 8
देशातील पहिली सी-प्लेन सेवा ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्धाटन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटपर्यंत सी-प्लेनने प्रवास करणार आहेत.
2 / 8
देशातील विमान कंपनी स्पाइसजेट ३१ ऑक्टोबरपासून दररोज सी-प्लेनची दोन उड्डाणे सुरू करणार आहे. ही उड्डाण सेवा अहमदाबाद ते केवडिया मार्गावर असणार आहे. या उड्डाण सेवेसाठी सुरुवातीला तिकिटांची किंमत १५०० रुपये आहे.
3 / 8
www.spiceshuttle.com या वेबसाइटवरून सी प्लेनचे तिकीट बुकिंग करता येईल. ३० ऑक्टोबरपासून तिकीट बुकिंग सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे सी-प्लेन हे साबरमती रिव्हर फ्रंटहून सकाळी १०: १५ वाजता उड्डाण करेल, तर केवडियामध्ये सकाळी १०: ४५ वाजता लँड होईल.
4 / 8
स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, 'भारतीय एव्हिएशनच्या इतिहासात प्रथमच सी-प्लेन उड्डाण करेल. या ऐतिहासिक क्षणी आम्ही एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.'
5 / 8
सी-प्लेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमधील असल्याचे म्हटले जाते. सी-प्लेनची सुरुवात पंतप्रधानांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, मात्र आता याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे.
6 / 8
गेल्या काही दिवसांपासून अहमदाबाद आणि केवडिया येथे सी-प्लेनसाठी जेट्टी बांधण्याचे काम चालू होते आणि इतर सर्व कामांचीही तयारी सुरू होती.
7 / 8
दरम्यान, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे सी-प्लेनमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती रिव्हरफ्रंटपर्यंत प्रवास करतील.
8 / 8
याचबरोबर, ३० ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी जंगल सफारी पार्क, क्रूझ बोट, भारत भवन, एकता नर्सरी, चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन करतील. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य वनचे उद्धाटन करतील आणि नवीन आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करतील.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातspicejetस्पाइस जेट