EPFO नंतर आता SBI चा जोरदार धक्का; महिनाभरात दोनदा व्याज कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:33 PM2020-03-11T13:33:28+5:302020-03-11T13:40:34+5:30

SBI ने या आधी 10 फेब्रुवारीला एफडीवरील व्याजदर कमी केले होते. एसबीआयने एफडीवरील व्याजदर कपातीला सुरुवात केल्याने अन्य बँकाही त्यांचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. बँकेने एकाच महिन्यात दुसऱ्यांदा रिटेल टर्म डिपॉझिट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर मिळणाऱ्या व्याजामध्ये कपात केली आहे.

मागील आठवड्यात ईपीएफओनेही पीएफवरील व्याजदरात कपात केली होती. व्याज दर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५ टक्क्यांवर आणला आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच एसबीआयने लॉकरच्या दरामध्ये वाढ केली होती. डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ झाली आहे.

आज एफडीमध्ये दोन कोटींपेक्षा कमी रक्कम असलेल्या ठेवींवर एसबीआयने व्याज दर घटविले आहेत. नवीन दर 10 मार्च 2020 पासून लागू होणार आहेत.

SBI ने एमसीएलआरच्या दरांमध्येही कपात केली आहे. यामुळे कार आणि होम लोनवरील ईएमआयही कमी होणार आहे.

एफडीवरील नव्या दरांनुसार 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर 4 टक्के व्याज, जे आधी 4.5 टक्के होते. एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.9 टक्के जे आधी 6 टक्के होते. 5 ते 10 वर्षांच्या अवधीच्या ठेवींवरही 5.9 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

एसबीआयने सांगितले आहे की, हे नवे दर नवीन डिपॉझिट आणि मॅच्य़ुअर होणाऱ्या डिपॉझिटच्या नुतनीकरणावर लागू होणार आहे.

एसबीआयने एफडीवरील व्याजदर कपातीला सुरुवात केल्याने अन्य बँकाही त्यांचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अर्धा टक्के जास्त व्याज देण्याची योजना सुरूच राहणार आहे.

SBI ने या आधी 10 फेब्रुवारीला एफडीवरील व्याजदर कमी केले होते.