शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:31 IST

1 / 5
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांना ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतील हवाई दलाने दाखवलेल्या पराक्रमाची झलक हवाई दलाच्या डिनरमधील मेन्यूकार्डमध्ये दिसून आली. यामध्ये विविध पदार्थांना जी नावं दिली होती, त्यांची यादी पाहिल्यावर पाकिस्तानची अस्वस्थता वाढण्याची दाट शक्यता आहे.
2 / 5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील इस्लामाबादसह अनेक हवाई तळांना आणि दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी हवाई दलाच्या भोलारी हवाईतळापासून ते मुरीदकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं.
3 / 5
दरम्यान, भारतीय हवाई दल दिनाच्या डिनरसाठी जे मेन्यू कार्ड तयार करण्यात आलं. त्यामध्ये रावळपिंडी चिकन टिक्का मसाला, भोलारी परीन मेथी मलाई आणि बालाकोट तिरामिसू यासारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय रफिकी रारा मटण, सुक्कूर शाम सवेरा कोफ्ता, मुझफ्फराबाद कुल्फी आणि बहावलपूर नान सारखे पदार्थ ठेवण्यात आले होते.
4 / 5
या मेन्यूकार्डमध्ये जी नावं देण्यात आली होती त्या सर्व ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरदरम्यान हल्ला केला होता. तसेच यातील अनेक ठिकाणांना उद्ध्वस्त केलं होतं. ९३ व्या हवाई दल दिनानंतर आज अनेक माजी सैनिकी अधिकारी, राजकीय नेते आणि पत्रकारांनी हे मेन्यूकार्ड सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
5 / 5
दरम्यान, हवाई दलाचं हे मेन्यूकार्ड आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले दहशतवादी तळ, एअरबेस आणि लष्करी तळांची नावं पदार्थांना देऊन त्यामधून पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली आहे. एवढंच नाही तर बालाकोट, मुझफ्फराबाद आणि मुरिदके येथील दहशतवादी अड्डे आणि प्रशिक्षण केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांची आठवण म्हणून या ठिकाणांची नावं मिठाईंना देऊन ही मिठाई वाटण्यात आली.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला