शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन लवकरच होणार खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 2:56 PM

1 / 7
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे.
2 / 7
पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील.
3 / 7
एकट्या गुलाबाच्याच तिथे 150 हून अधिक प्रजाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत.
4 / 7
दिल्ली शहराची उभारणी करणारा सर एडवर्ड ल्युटन्स याने या मुघल गार्डनची उभारणी केली होती.
5 / 7
ब्रिटिश काळातील भारतातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्जच्या पत्नीसाठी ते उभारण्यात आले.
6 / 7
मुघल गार्डन 6 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
7 / 7
मात्र दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि 2 मार्च रोजी होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे.