थलायवा रजनीकांत हिमालयाच्या यात्रेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 14:16 IST2018-03-13T14:16:14+5:302018-03-13T14:16:14+5:30

सुपरस्टार थलायवा रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक यात्रेवर आहेत. हिमालयात घोडेस्वारी करतानाचा रजनीकांत यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या अध्यात्मिक यात्रेवर जाण्यापूर्वी चेन्नई एअरपोर्टवर रजनीकांत यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला. ही यात्रा कमीत कमी 15 दिवसांची असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
रजनीकांत प्रत्येक वर्षी हिमालयाचा दौरा करतात आणि अध्यात्मिक गुरुंची भेट घेतात.
पांढऱ्या शुभ्र कपड्यांमधील अध्यात्मिक गुरुंसोबतचा त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.