शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 3:59 PM

1 / 6
राजस्थानच्या एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अभयारण्य परिसरात एक महिला एका खडकाखाली दबली गेली होती. दिवाळीनिमित्ताने घराला माती लावण्याासाठी ही महिला गेली असताना ही घटना घडली.
2 / 6
माती खोदत असताना एक मोठा दगड महिलेच्या अंगावर पडला आणि ती दबली गेली. दगडाखाली दाबून महिलेचे दोन्ही हात चिरडले गेले. महिलेने आरडाओरडा केला तेव्हा जवळपासच्या महिलांनी ग्रामस्थांना याबाबत सांगितले. त्या ठिकाणी काही महिला उपस्थित होत्या म्हणून या महिलेला वाचवण्यात यश आलं.
3 / 6
ग्रामस्थांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी कैलासचंद बैरवाही घटनास्थळी पोहोचले. या महिलेला वाचविण्यासाठी उपस्थित लोकांनी बचावकार्य सुरू केले, पण लोकांना एकत्र करून दगड उचण्याशिवाय या महिलेकडे कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. गडाखाली संपूर्ण शरीर दाबलेले असल्यामुळे ही महिला वेदनेने विहळत होती.
4 / 6
ही घटना ग्रामीण भागात घडल्यामुळे क्रेन किंवा कोणताही जेसीबी उपस्थित नव्हता. म्हणून लोकांनी मिळून हातानेच दगड उचलायला सुरूवात केली.
5 / 6
दोन तास मेहनत करून साखळीचा वापर करत अखेर या महिलेला वाचवण्यात यश आले. गावकऱ्यांना या महिलेला जीवंत बाहेर काढण्यात यश आलं. जखमी महिलेचं नाव लाखो देवी असून त्वरित करौली रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.
6 / 6
जयपूरमध्ये या महिलेचा जीव वाचविण्यासाठी, तिचा डावा हात कोपऱ्यातून काढावा लागला. त्याच्या उजव्या हाताची स्थिती देखील गंभीर असल्याचे म्हटले जाते. महिलेवर उपचार सुरू आहेत. या फोटोमधून महिलेची गंभीर अवस्था दिसून येईल.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटके