मानलं राव... दिवाळीत तुम्हाला घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे स्टाफ 'ऑन ड्युटी २४ तास'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 04:59 PM2023-11-12T16:59:46+5:302023-11-12T17:18:11+5:30

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं.

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं.

म्हणूनच दिवाळीच्या सुट्ट्यांत सुट्ट्यांचं नियोजन करुन गावी जाण्याची लगबग आणि धडपड सर्वांचीच पाहायला मिळते. त्यासाठी, रेल्वे आणि बससेवांचा वापर आलाच.

आपली दिवाळी गोड व्हावी, आपली दिवाळी आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने साजरी व्हावी यासाठी बस आगारातील कर्मचारी, रेल्वे विभागातील कर्मचारी आणि पोलीस खात्यातील कर्मचारीही ऑन ड्युटी २४ तास कार्यरत असतात.

दिवाळीच्या सणाला या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. एक्स्ट्रा ड्युटीही त्यांना करावी लागते. म्हणूनच, सर्वसामान्य नागरिक दिवाळीचा सुखद प्रवास करुन येतो.

बस आगारातील कर्मचारी रस्तेमार्गे आपल्याला गावी पोहोचवतात, रेल्वेचे कर्मचारी जलद गतीने गावी पोहोचवण्यास आपली मदत करतात. तर, आपल्या सुरक्षेसाठी पोलीसही बांधव तैनात असतात.

यंदा दिवाळीच्या सणानिमित्त मध्य रेल्वेने दररोज धावणाऱ्या गाड्यांशिवाय ५०९ विशेष फेस्टीव्हल ट्रेन चालवल्या आहेत. गतवर्षी २७० ट्रेन धावल्या होत्या. या ट्रेनमधून तब्बल ७.५० लाख प्रवाशांची वाहतूक झाली आहे.

विशेष म्हणजे दिवाळीच्या आदल्यादिवशी मध्य रेल्वेने ३७१ मेल, १३३ पॅसेंजर, ४६ फेस्टीव्हल ट्रेन अशा एकूण ५५० कोचिंग ट्रेन रेल्वे मार्गावर चालवल्या आहेत. ज्यामधून लाखो नागरिक आपल्या गावी जाऊन दिवाळी करू लागले.

आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेचे कर्मचारी नक्कीच दिवस-रात्र जागून काम करत होते. ऑन ड्युटी २४ तास कर्तव्य बजावत ते आपल्याला गावी पोहोचवत होते.

रेल्वे स्टाफमध्ये, मोटरमन, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, कंट्रोलर, स्टेशन मास्टर, टीटीई, आरपीएफ, पॉईंट्समन, बुकींग स्टाफ, ट्रॅकमन, ट्रेन एक्झामिशन स्टाफ, स्वच्छता कर्मचारी यांनी या सर्वच ट्रेन व्यवस्थीत धावण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली, ज्यामुळे लाखोंची दिवाळी आपल्या गावी साजरी झाली.

मध्य रेल्वेनं ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे