पुण्यतिथी विशेष : तेव्हा देशाच्या चलनी नोटांवर पहिल्यांदाच गांधींजींचा फोटो छापला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 09:28 AM2021-01-30T09:28:48+5:302021-01-30T09:57:09+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.

देशाच्या चलनी नोटांवर फोटो असण्याचा मान स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव नेत्याला मिळाला आहे. तो म्हणजे महात्मा गांधी यांना. सर्वप्रथम 1969 मध्ये देशाच्या चलनी नोटांवर गांधींजींचा फोटो दिसून आला.

भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली

महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता.

सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीची नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आली.

भारतीय चलनामध्ये सगळ्यात मोठा बदल दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2016 ला करण्यात आला. 8 नोव्हेंबर 2016 ला महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या.

नोटबंदी निर्णयानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र आहे. महात्मा गांधींसह देशाची संस्कृती आणि इतिहास दर्शवणारीही चित्रे नोटांवर दिसून येतात.

प्रत्येक देशाच्या चलनी नोटांवर काही विशिष्ट फोटो असतात. भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं?

प्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतामध्ये नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. एक रुपयाची नोट भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.

भारताच्या चलनातल्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे. हा फोटो बदलून त्याजागी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, म्हणजे रुपयाची परिस्थिती सुधारेल असा सल्ला भाजप नेते आणि राज्यसभेतले खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्यानंतर त्यावरून वादही निर्माण झाला होता.