MahaKumbh 2025: ISRO ने अंतराळातून टिपली महाकुंभमेळ्याची दृश्यं, तुम्ही बघितलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:59 IST2025-01-22T15:52:58+5:302025-01-22T15:59:02+5:30
MahaKumbh ISRO Photos: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची इस्रोच्या सॅटेलाईटने अंतराळातून फोटो टिपले आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा होत आहे. कोट्यवधी भाविक कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये आले असूनू, गर्दीने नदीकाठ आणि शहर फुलून गेले आहे.
महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांचा जनसागर उसळलेले प्रयागराज अंतराळातून कसे दिसते, याचे आता फोटोही समोर आले आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाईटने फोटो घेतले आहेत.
इस्रोने फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाईटचा वापर केला आहे. दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडारसॅटचा उपयोग करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्याचे फोटो हैदराबादमधील राष्ट्रीय सेन्सिंग सेंटरमधून घेण्यात आली आहेत.
एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हे फोटो घेण्यासाठी रडारसॅटचा वापर केला आहे. कारण ढगांच्या आड जाणारी गर्दीही व्यवस्थित दिसते.
सी बँड मायक्रोवेव सॅटेलाईटच्या द टाइम सीरिज इमेजस् चांगल्या रेझ्युलेशनसह आहेत. यात उभारण्यात आलेले तंबूंही व्यवस्थित आले आहेत. त्याचबरोबर जे पूल उभारण्यात आलेले आहेत, तेही फोटोत व्यवस्थित आले आहेत.
६ एप्रिल २०२४ रोजी महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी टाइम सीरिज फोटोमध्ये प्रयागराजमधील परेड मैदान दिसत आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी आणि १० जानेवारी २०२५ रोजी गर्दी होत असलेली गर्दी दिसत आहे.
नवीन शिवालय पार्कही अंतराळातून काढण्यात आलेल्या फोटोत दिसत आहे. ६ एप्रिल २०२४ रोजीच्या फोटोत मैदान रिकामं दिसत आहे. २२ डिसेंबर २०२४ रोजी शिवालय पार्क दिसत आहे. भारताच्या नकाशाच्या आकारात हे शिवालय बनवण्यात आलेले आहे.