पंतप्रधान मोदींची पावलं वळली शिमल्यातील 'इंडियन कॉफी हाऊस'कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:08 IST2017-12-27T16:05:22+5:302017-12-27T16:08:43+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर परतत असताना मोदींनी शिमल्यातील 'इंडियन कॉफी हाऊस'ला भेट दिली.

माल रोडजवळ असणाऱ्या या 'इंडियन कॉफी हाऊस'मधील कॉफीचा आस्वादही मोदींनी घेतला. यावेळी जुन्या दिवसांच्या काही आठवणी मोदींनी ताज्या केल्या.

तरूणपणात पक्षाच्या कामासाठी हिमाचल प्रदेशात येत असताना मोदी या कॉफी हाऊसमध्ये यायचे.

वीस वर्षांआधी जशी कॉफीची चव होती तशीच चव आजही असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.