१८ वर्षांनी गीरमध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी; खास फोटो पोस्ट करत म्हणाले, "आज थोडा प्रयत्न..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:37 IST2025-03-03T12:05:01+5:302025-03-03T12:37:27+5:30
PM Modi in Gir Lion Safari: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त ते आशियाई सिंहांना पाहण्यासाठी गीर राष्ट्रीय उद्यानात पोहोचले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील गीर राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद लुटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगल सफारीचा व्हिडिओ समोर आला आहे. सूर्योदय होताच पंतप्रधान मोदी गीर राष्ट्रीय उद्यानात पोहोचल्याचे पाहायला मिळालं. त्याच्या हातात कॅमेरा दिसला. ते फोटो क्लिक करतानाही दिसले.
सोमनाथहून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सासन येथील वन गेस्ट हाउस 'सिंह सदन' येथे रात्री मुक्काम केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भल्या पहाटेच गीर राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीसाठी पोहोचले होते.
गीर अभयारण्याच्या जंगल सफारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटोग्राफीही केली. त्यांनी सिंहांचे फोटो काढले. गीरमध्ये आशियाई सिंहांची संख्या मोठी आहे. यामुळे गीर जगभर प्रसिद्ध आहे.
तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून गीरच्या अभयारण्यामध्ये गेले होते. गीर दौऱ्यात पंतप्रधान मोदी एका नव्या अंदाजात दिसले.
खुल्या जिप्सीमध्ये गीर अभयारण्याला भेट देताना पंतप्रधान मोदींनी सिंहांचे फोटो काढले. जेव्हा सूर्याची पहिली किरणे पडली त्याआधीच पंतप्रधान मोदी तिथे पोहोचले होते.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज त्यांच्या गीर दौऱ्यात २९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रोजेक्ट लायनचा शुभारंभ करणार आहेत.