Photos : विधानसभेची 'शाळा' भरली, अर्थसंकल्पीय अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:42 PM2020-02-24T13:42:37+5:302020-02-24T13:57:23+5:30

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीची एंट्री, उत्साह अन् नमस्कार भावमुद्रा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हे पहिलच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यांनीही मोठ्या उत्साहात अधिवेशनाला हजेरी लावली

महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे आमदारांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले, त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली

विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केले.

सरकारने सर्वच आमदारांसाठी चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी एकत्र आलेले काँग्रेस आमदार आणि मंत्री अमित देशमुख

आमदार भाई जगताप यांनी नेमका काय जोक केला असेल, की सगळेच हसायला लागलेत

नवाब मलिक अमित देशमुख यांना काय बरं समजावून सांगत असतील?

राष्ट्रवादीचं घड्याळ काँग्रेसच्या हातात, काय म्हणता...!

देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांत राज्यात वाढलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारचा निषेध नोंदवला, तसेच सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची फलकबाजीही केली