देशभरासह महाराष्ट्रात पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 23:46 IST2019-02-15T23:28:41+5:302019-02-15T23:46:05+5:30

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली.

या हल्ल्याच्या निषेधार्थ रझा अकादमीही रस्त्यावर उतरली.

मुंबईतील भेंडी बाजार, डोंगरी या भागात रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.

नागरिकांनी रस्त्यावर उतरून आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

पाकिस्तानचा निषेध नोंदवत अनेकांनी रस्त्यावर उतरून पाकचे झेंडे जाळले आहेत.

तर काहींनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या अनेक भागातून लोकांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तानचे झेंडे जाळले आहेत.

पाकिस्तानचा सर्वच स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे.