20व्या वर्षीच 20 हजार कोटींचे मालक, जाणून घ्या कोण आहेत पद्मनाभ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:48 PM2019-01-04T16:48:32+5:302019-01-04T17:01:57+5:30

वयाच्या 20व्या वर्षीच 20 हजार कोटींच्या संपत्तीचे पद्मनाभ सिंह एकटेच वारस आहेत.

राजमहालातल्या एखाद्या राजकुमारासारखं ते आयुष्य जगतात.

जयपूरचे राजा पद्मनाभ सिंह यांचं राहणीमान राजेशाही थाटाचं आहे.

राजकुमारी दिया कुमार आणि नरेंद्र सिंह यांचे पुत्र असलेले पद्मनाभ सिंह हे जयपूरचे तरुण राजकुमार आहेत.

त्यांना देश-विदेशात फिरायला फार आवडते.

प्रेमानं लोक त्यांना पाचो अशी हाक मारतात.

ते जयपूरच्या शाही कुटुंबातील 303वे वंशज आहेत.

दक्षिण आफ्रिका, इटली, स्पेन, थायलँड, कोलंबिया, पेरू आणि पोर्तुगालसह अनेक देश फिरले आहेत.

आलिशान जीवनासह पद्मनाभ यांनी उच्चशिक्षणही घेतलं आहे.

त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवलेली आहे. भारतीय पोलो टीमचे ते कर्णधार आहेत.