सोनियांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 23:03 IST2018-03-13T21:56:16+5:302018-03-13T23:03:00+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी आज आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला विरोधी पक्षांमधील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

सपाचे रामगोपाल यादव, बसपाचे सतीश मिश्रा, शरद यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची या स्नेहभोजनामधील उपस्थिती उल्लेखनीय होती.

द्रमुकच्या कनिमोळी यासुद्धा या स्नेहभोजनास उपस्थित होत्या.

लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी या स्नेहभोजनामध्ये राजदचे प्रतिनिधित्व केले.

नॅशनल कॉन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला हेसुद्धा या स्नेहभोजनास उपस्थित होते.

आसाममधील एआययूडीएफचे नेते बदरुद्दीन अजमल यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती.