एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 08:19 IST2025-07-17T08:04:39+5:302025-07-17T08:19:00+5:30
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इंजिन बिघडल्याने बुधवारी रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

आणखी एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. हा अपघात पायलटच्या हुशारीमुळे टळला आहे.
बुधवारी रात्री दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर पायलटने रात्री ९.२५ वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर, रात्री ९:४२ वाजता विमान सुरक्षितपणे उतरले.
विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E-231 मध्ये टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
विमानाच्या एका इंजिनमध्ये हवेतच बिघाड झाला, त्यानंतर पायलटने तात्काळ एटीसीला कळवले आणि मुंबईत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.
रात्री ९:२५ वाजता आपत्कालीन अलार्म वाजल्यानंतर, विमानतळावर संपूर्ण आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या. रात्री ९:४२ वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
या प्रकरणावर इंडिगोने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले की,'१६ जुलै २०२५ रोजी, दिल्लीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे उड्डाण करत असताना, फ्लाइट क्रमांक ६ई ६२७१ मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला.
त्यानंतर, नियमांचे पालन करून, विमान वळवून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे उतरवण्यात आले.
विमान पुन्हा उड्डाण करण्यापूर्वी त्याची आवश्यक तपासणी आणि देखभाल केली जाईल. सध्या विमानाची तपासणी सुरू आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
ते विमान प्रवाशांना घेऊन लवकरच रवाना होईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.