कंगनाच नाही या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले आहे नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 18:02 IST
1 / 6 बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणौतने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चांगले आणि योग्य उमेदवार आहेत, असे ती म्हणाली होती. मात्र मोदींचे कौतुक करणारी कंगना ही काही बॉलिवूडमधील पहिलीच कलाकार नाही. 2 / 6याआधी आमीर खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. नोटाबंदीच्या वेळी आमिरने त्या निर्णयाचे कौतुक केले होते. तसेच हा निर्णय देशासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते. 3 / 6दबंग सलमान खान यानेही नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. 4 / 62014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर शाहरुख खानने मोदींचे कौतुक केले होते. 5 / 6एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन हिने नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक केले होते. मोदी देशासाठी खूप काही करत असल्याचे तिने म्हटले होते. 6 / 6प्रीती झिंटा हिनेही नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक केले होते.