शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : ...अन्यथा डिसेंबरपर्यंत देशातील ५० टक्के जनता सापडेल कोरोनाच्या कचाट्यात; तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 10:51 PM

1 / 12
देशात कोरोनाचं संक्रमण दिवसागणिक वाढत चाललं असून, लॉकडाऊनचा पाच टप्पाही लवकरच सुरू होणार आहे.
2 / 12
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार असून, केंद्रानं त्यासाठी नियमावलीही प्रसिद्ध केली आहे.
3 / 12
पण जर पुढेही लॉकडाऊन उठवले तर डिसेंबरपर्यंत देशातील 50 टक्के कोरोनाच्या विळख्यात सापडेल, असा धक्कादायक इशारा भारतातल्याच वैज्ञानिक अन् डॉक्टर असलेल्या व्ही. रवी यांनी दिला आहे.
4 / 12
इंडियन एक्स्प्रेसनं NIMHANSचा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्या अहवालात डॉ. व्ही. रवी यांनी धक्कादायक बाब निदर्शनास आणून दिली आहे.
5 / 12
31 मे रोजी लॉकडाऊन 4.0 संपल्यानंतर जूनपासून हा आकडा वाढण्यास सुरुवात होईल. देशात समूह संसर्ग होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
6 / 12
डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील निम्मी जनता कोरोनानं बाधित होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
7 / 12
न्यूरोव्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सचे (NIMHANS) प्रमुख कर्नाटकातील कोरोना हेल्थ टास्क फोर्सचे नोडल ऑफिसर डॉ. व्ही. रवी (Dr. V. Ravi) यांनी हा समूह संसर्ग होण्याचा दावा केला आहे.
8 / 12
ते म्हणाले, आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. पण 31 मे रोजी लॉकडाऊन 4.0 संपल्यानंतर जूनपासून हा आकडा वाढण्याची भीती आहे.
9 / 12
देशात कम्युनिटी ट्रान्समिशनही होऊ शकते, असाही दावा त्यांनी केला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील अर्धी लोकसंख्या कोरोनानं संक्रमित होईल.
10 / 12
90 टक्के लोकांना माहितीही नसेल की ते कोरोनाग्रस्त झाले आहेत. राज्यांनी ही प्रकरणं हाताळण्यासाठी तयार राहायला हवं', असा सल्लाही डॉ. रवी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
11 / 12
कोरोना रुग्णांमध्ये होणारी ही वाढ लक्षात घेता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार सर्व राज्यांना प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन कोरोना टेस्टिंग लॅब असाव्यात अशा सूचना दिल्यात, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे.
12 / 12
आपल्याला मार्च 2021पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागेल. लोकांनी कोरोनाबरोबर जगायला शिकलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या