शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nawab Malik: मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 4:33 PM

1 / 10
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली.
2 / 10
विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
3 / 10
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत असून केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
4 / 10
याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
5 / 10
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि युपीच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या अटकेचं कनेक्शन युपीतील निवडणुका असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
6 / 10
उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या सर्वसाधारण निवडणुकांना प्रभावित करण्यासाठीच कधी देशात दहशतवादाच्या नावाने आणि आता महाराष्ट्रात होत असलेल्या तपास यंत्रणांद्वारे जे होत आहे, ते दुर्दैवी आहे.
7 / 10
जनतेनं अवश्य सतर्क राहावे, असे मायावती यांनी ट्विट करु म्हटलं आहे. मायावती यांच्या ट्विटचा रोख पूर्णपणे नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भातच होता.
8 / 10
माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजपचे लोक काहीही करू शकतात. ते कोणालाही अपमानित करू शकतात. त्याला काही कारण हवेच असे नाही.
9 / 10
भाजपाला कशाचीतरी भीती वाटत आहे. ते घाबरले आहेत आणि त्यातून त्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे. अडचणीचे ठरतील अशा व्यक्तींना टार्गेट करायचे हे त्यांचे जुनेच कारनामे आहेत.
10 / 10
अशा व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याला जेलमध्ये टाकले जाते. त्याची मानहानी केली जाते. सूडबुद्धीने हे उद्योग चालतात. असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला आहे. मलिक यांच्याबाबतीतही तेच झाले' असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :nawab malikनवाब मलिकmayawatiमायावतीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय